संपादकीय
आमची भूमिका
साप्ताहिक आर्यव्रत हे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना आणि स्थानिक पातळीवरील घडामोडींना व्यासपीठ देण्यासाठी कार्यरत असलेले मराठी साप्ताहिक वृत्तपत्र आहे.
पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजासमोरील प्रश्न तथ्यांच्या आधारे मांडण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून साप्ताहिक आर्यव्रतचे वृत्तांकन केले जाते.
बातम्यांमध्ये तथ्य, संतुलित मांडणी आणि वस्तुनिष्ठतेला प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न असतो. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा घटनेबाबत वृत्तांकन करताना उपलब्ध माहितीच्या आधारे बातमी मांडणे आणि संबंधित विषयाची विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सामान्य नागरिकांच्या समस्या, स्थानिक प्रश्न, प्रशासन, सामाजिक विषय, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि विविध क्षेत्रांतील घडामोडींना योग्य स्थान देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
साप्ताहिक आर्यव्रत — आवाज सर्वसामान्य जनतेचा.
