प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांकडून अभिवादन; काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

मंठा | गजानन माळकर पाटील, तालुका प्रतिनिधी

मंठा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) साजरी करण्यात आली. यानिमित्त मंठा येथील तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंठा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विवेकराव घारे पाटील, माजी तालुकाध्यक्ष निळकंठराव वायाळ, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव सुरेश वावळे, विलास वावळे, राजेश काकडे, बाबुराव शेंडगे, लक्ष्मण (बंडू नाना) घारे, चिंतामणी गाडेकर आणि लक्ष्मण रेंगे यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *