शिवराज टी हाऊस परिसरातील घटनेनंतर दोन्ही बाजूंकडून आरोप; एका गुन्ह्यातील फिर्यादी दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी

पैठण : प्रतिनिधी

पैठण शहरात २२ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आशिर्वाद मंगल कार्यालयासमोरील शिवराज टी हाऊस परिसरात झालेल्या वादाच्या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२७/२०२६ आणि ४२८/२०२६ अशा दोन स्वतंत्र नोंदी करण्यात आल्या असून, दोन्ही तक्रारींमध्ये परस्पर आरोप करण्यात आले आहेत.

गुन्हा क्रमांक ४२८/२०२६ : मुजम्मील शेख यांची तक्रार

या प्रकरणात मुजम्मील सलीमोद्दिन शेख (वय ३४, रा. संजारपुरा, नेहरू चौक, पैठण) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, हमीद मुरतुजा खान यांनी शिवीगाळ व मारहाण करून चावीच्या कटरने डाव्या हाताला दुखापत केल्याचा आरोप आहे. तसेच, तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर कैसरजहा हमीद खान यांनी थप्पड मारली, तर कैसरजहा हमीद खान, जाहिद खान हमीद खान आणि मुजाहिद रशीद खान यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणात हमीद मुरतुजा खान, कैसरजहा हमीद खान, जाहिद खान हमीद खान आणि मुजाहिद रशीद खान यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५, ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा क्रमांक ४२७/२०२६ : कैसरजहा खान यांची तक्रार

दुसरीकडे, या प्रकरणात कैसरजहा हमीद खान (वय ५२, रा. जोहरीवाडा, पैठण) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आशिर्वाद मंगल कार्यालय येथे त्यांच्या पतीला मारहाण झाल्यानंतर संबंधित व्यक्तींनी त्यांच्या जोहरीवाडा येथील राहत्या घरात प्रवेश केला. तेथे शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच, महिलेच्या कपड्यांबाबतही तक्रारीत गंभीर आरोप नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणात हसनोद्दिन कुतबिद्दिन कटयारे, मुजम्मील सलीम शेख, हुजेर नासिर कटयारे, नासिर कुतबिद्दिन कटयारे, मुफाशिर सलीम कटयारे आणि जावेद इमाम शेख ऊर्फ सोनू या सहा जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३३२, १८९(२), १९०, १९१(१), १९१(२), ३५२ व ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही गुन्ह्यांमध्ये परस्पर संबंध

या दोन्ही गुन्ह्यांमध्ये घटनास्थळ व वेळेचा संदर्भ समान आहे. गुन्हा क्रमांक ४२८/२०२६ मधील फिर्यादी मुजम्मील सलीमोद्दिन शेख यांचा गुन्हा क्रमांक ४२७/२०२६ मध्ये आरोपी म्हणून उल्लेख आहे. तसेच, गुन्हा क्रमांक ४२८/२०२६ मधील आरोपी कैसरजहा हमीद खान या गुन्हा क्रमांक ४२७/२०२६ मधील फिर्यादी आहेत. त्यामुळे एकाच वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्याचे पोलीस नोंदींवरून स्पष्ट होते.

दोन्ही गुन्हे पोहेकॉ जाधव यांनी दाखल केले असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव गोमारे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ पालवे करीत आहेत. दोन्ही बाजूंकडून करण्यात आलेले आरोप तपासाधीन असून, प्रकरणातील नेमका घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *