महिला सक्षमीकरण, प्रबोधनात्मक कार्यक्रमांसह सांस्कृतिक स्पर्धा आणि गरबा-दांडियाचे आयोजन

पैठण | विशेष प्रतिनिधी

पैठण शहरातील रंगारहाट्टी गल्ली येथील श्री कालिका देवी नवरात्र उत्सव २०२६ साठी नव्या महिला कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यंदाचा नवरात्रोत्सव सामाजिक प्रबोधन, महिला सक्षमीकरण तसेच विविध कला व सांस्कृतिक उपक्रमांसह साजरा करण्याचा संकल्प समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पुनम जैस्वाल, तर उपाध्यक्षपदी पूजा असोलकर यांची निवड करण्यात आली. सचिवपदी अश्विनी ठोंबरे, सहसचिवपदी रंजीता दायमा, कोषाध्यक्षपदी श्रद्धा रावस, तर सहकोषाध्यक्षपदी प्रीती कुलकर्णी व वैशाली खीस्ती यांची निवड झाली.

स्पर्धा प्रमुखपदी स्वाती साळुंके, स्पर्धा उपाध्यक्षपदी कोमल तरटे यांची जबाबदारी देण्यात आली आहे. दांडिया प्रमुख म्हणून पायल ठोंबरे, कल्पना परागे, अश्विनी लोंढे, सुवर्णा सारडा, भारती जव्हेरी व संगीता आखेगावकर काम पाहणार आहेत.

स्वागत प्रमुख म्हणून राणी गोजरे, संगीता चौधरी, स्वाती भारदे, अंकिता सराफ व स्वाती जाधव, तर छायाचित्र व प्रसिद्धी समितीत सीमा मुळे, पूजा सराफ, कल्पना बीचुकले व रुपाली मोदाणी यांचा समावेश आहे.

आरती नियोजन प्रमुख म्हणून राणी रावस, गीतांजली रावस व यामिनी सराफ यांची निवड करण्यात आली आहे.

यंदाच्या नवरात्रोत्सवात महिलांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध सांस्कृतिक स्पर्धा तसेच पारंपरिक गरबा-दांडियाचे आयोजन करण्यात येणार आहे. श्री कालिका देवीच्या दर्शनासह उत्सवातील विविध कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नवनिर्वाचित महिला समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *