ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर; आरोग्यविषयक जनजागृती आणि अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन

मंठा | तालुका प्रतिनिधी गजानन माळकर पाटील

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासह नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मंठा येथे ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई आणि गटविकास अधिकारी विनय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. यावेळी ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

कार्यशाळेला मंठा तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होते.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगन्नाथ कुडंकर, सुजीत वाघमारे, वैद्यकीय अधिकारी जगदीश खरात, डॉ. कांचन कांगणे आणि तालुका समूह संघटक कुसुम बुधवंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे या कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आले. तसेच अभियानाची गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *