नाशिक येथे ॲस्पायर फाउंडेशनतर्फे गौरव; शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल
पैठण | प्रतिनिधी
ॲस्पायर फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रामदास रामावत यांना प्रदान करण्यात आला. नाशिक येथील नांदूर नाका परिसरातील संजीवनी बँक्वेट हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
ॲस्पायर फाउंडेशनचे अध्यक्ष बबनराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विशाल पाटील तांबे उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून निवड झालेल्या शिक्षकांचा या कार्यक्रमात शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
प्राचार्य रामदास रामावत हे शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित असून सामाजिक व सार्वजनिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. वक्तृत्व आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची क्षमता ही त्यांची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांच्याविषयी देण्यात आलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. आपल्या कार्यातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यापूर्वी २०२५ मध्ये रोटरी क्लब, पैठण यांच्या वतीनेही रामावत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता ॲस्पायर फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थाध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे संचालक प्रा. संतोष पाटील तांबे यांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे स्कूल कॉर्डिनेटर शैजू डॅनियल, लीड कॉर्डिनेटर एम. के. कोळगे, डॉ. जे. ई. येवले, प्रियंका औटी, सारिका धोकटे, बी. आर. पठाण, सिद्धाप्पा औरंगे, लता पवार, भाग्यरथा देशमुख, माया मधु, कविता दसपुते, सोनाली गोरे, सोनाली धनवडे, संदीप तांबे, यश परदेशी, हर्षदा मुळे, ऋषिकेश नवथर, निलेश देशमुख, कैलास देशमुख आणि योगेश नवथर यांच्यासह इतरांनी रामावत यांचे अभिनंदन केले.
