१७ मतदान केंद्रांसाठी १३ पोलीस अधिकारी आणि ५८ अंमलदारांची नियुक्ती; उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शन

पैठण | प्रतिनिधी

पदवीधर विधान परिषद निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने पैठण तालुक्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील एकूण १७ मतदान केंद्रांसाठी १३ पोलीस अधिकारी आणि ५८ पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बंदोबस्तासाठी नियुक्त अधिकारी व अंमलदारांना उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर संबंधित पथकांना बंदोबस्तासाठी रवाना करण्यात आले.

या बंदोबस्तामध्ये मतदान केंद्रांवरील सुरक्षा, सेक्टर पेट्रोलिंग, स्ट्राइकिंग फोर्स आणि स्ट्राँग रूम गार्ड यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

यावेळी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, बिडकीनचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके, MIDC पोलिस ठाणे पैठणचे भरत मोरे आणि पाचोडचे सचिन पंडित यांच्यासह बंदोबस्तासाठी नियुक्त इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच मतदान केंद्रांवर आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून नियोजन करण्यात आले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *